बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक वर्ष मोफत काम करण्यासाठी तयार, पण नोकर भरती करा- विनोद पाटील

औरंगाबाद | नोकरभरती रद्द करणे याचा अर्थ एक पिढी उद्धवस्त करणे. जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत आम्ही मोफत काम करण्यासाठी तयार आहोत, पण नोकरभरती करा, अशी मागणी मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे.

तरुण वर्गासाठी राज्य सरकारने दुर्देवी निर्णय घेतला आहे, असं विनोद पाटील म्हणाले आहेत. विनोद पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र त्यांनी फेसबुकवर शेअर केलंय.

राज्य सरकारच्या नोकरभरती रद्द करण्याच्या निर्णयामुळे तरुण पिढीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नैराश्य येईल. राज्यासमोर आर्थिक संकंट आहे. पण याचा अर्थ असा तर नाही की, नोकरभरतीच रद्द करावी, असं विनोद पाटील म्हणाले आहेत.

सरकार जास्तीत जास्त उप जिल्हाधिकारी आणि कमीत कमी शिपाई या पदाची भरती करु शकते. अशा परिस्थितीत हे सर्व नवीन उमेदीचे अधिकारी राज्याचे सेवा करतील, असा दावा विनोद पाटील यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत- अशोक चव्हाण

‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही?’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More