…अन्यथा भाजपने माफी मागावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांवर अमूल्य हिरा विकण्याची वेळ आली होती, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला जातोय. 

मराठा क्रांती मोर्चाकडून श्याम जाजू यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच श्याम जाजू यांनी पुरावे द्यावेत, अन्यथा भाजपने जाजू यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी केलीय. 

औरंगाबादमध्ये माहेश्वरी समाजाच्या कार्यक्रमात श्याम जाजू यांनी हे वक्तव्य केलं होतं. मात्र याप्रकरणी आता नव्या वादाला तोंड फुटलंय.