मराठा आंदोलकांचा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांनाही मोठा झटका!

पंढरपूर | मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने सरकारला वेळ वाढवून देण्यात आला आहे, मात्र असं असलं तरी सरकारविरोधातील असंतोष काही कमी होताना दिसत नाहीये. याचा फटका राज्यातील नेते तसेच मंत्र्यांना बसताना पहायला मिळत आहे. आता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे.

कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या उलाथापालथी झाल्या, त्यामध्ये महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले. कधी नव्हे असा प्रकार घडल्याने काही ठिकाणी पेच निर्माण झालेले पहायला मिळत आहेत. आता कार्तिकीच्या महापूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना मिळणार असा प्रश्न असताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पुढे नवीनच समस्या निर्माण झाली आहे.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मानाला विरोध!

कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेला काही मराठा आंदोलकांकडून विरोध करण्यात आला आहे. ही महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होण्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच समितीच्या सदस्यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. कार्तिकी यात्रेच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेली ही बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. भक्त निवासामध्ये ही बैठक सुरु होती, त्याचवेळी  रामभाऊ गायकवाड यांच्यासह मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या, त्यामुळे काही काळ याठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला होता.

नेमका कुणाला द्यायचा मान?

महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यातील कोणाला शासकीय महापूजेचे निमंत्रण द्यायचे यावरून मंदिर समितीपुढेच मोठा पेच निर्माण झाला आहे, त्यात मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या दिवशी शासकीय महापूजा करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे आता मंदीर समितीपुढे आणखी एक पेच तयार झाला आहे.

मंदिर समितीने शासकीय महापूजेचे निमंत्रणच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देवू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर विधी व न्याय खात्याला कळवण्यात येईल तसेच सरकारकडून येणाऱ्या सुचनेनुसार निर्णय घेतला जाईल, अशी  भूमिका मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी घेतली आहे.

दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. शक्यतो वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ शकते, असं सूचक वक्तव्य सुद्धा औसेकर महाराजांनी यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

बच्चू कडूंची ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल