Maratha MLA | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मराठा आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. लोकसभेत महायुतीला जरांगे फॅक्टरचा चांगलाच फटका बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत जरांगे यांचा करिश्मा फेल ठरल्याचं बोललं जातंय. सर्वात अगोदर तर स्वतः जरांगे यांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली होती. लढतीच्या जागाही ठरल्या होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. (Maratha MLA )
या विधानसभा निवडणुकीत मराठा कार्ड चालले का, त्याचा फायदा कुणाला झाला तसेच राज्यात एकूण किती मराठा आमदार निवडून आले, ते पाहुयात. यावेळी सहा प्रमुख पक्ष व दोन आघाड्यांमध्ये लढत होती. तिसरी आघाडी, वंचित, एमआयएम, मनसे, अपक्ष अशी पक्ष या निवडणुकीत उभी होती. मात्र, जनतेने यापैकी महायुतीच्या पदरात सर्वाधिक मते पाडली.
मराठा कार्डचा फायदा कुणाला?
महायुतीचे तब्बल 234 आमदार निवडून आले. तर, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत मराठवाड्यात मराठा कार्ड चालल्याचे दिसून आले. पण, याचा फायदा हा महायुतीला झाला आहे. मराठवाड्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. विधानसभेच्या 46 पैकी केवळ 5 जागा कशाबशा महाविकास आघाडीला राखता आल्या. तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली आहे. (Maratha MLA )
महायुतीला मात्र मराठवाड्यात 46 पैकी 40 जागांवर घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीचे सर्वात जास्त 25 मराठा आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे मराठा फॅक्टरचा सर्वाधिक महायुतीलाच फायदा झाल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीचे फक्त 4 मराठा आमदार विजयी झाले आहेत. तर, ओबीसींचे 8 आमदार विजयी झाले आहेत. 8 पैकी 7 ओबीसी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
मराठवाड्यात सर्वाधिक आमदार कोणत्या पक्षाचे?
तसेच, राखीव जागांवर 5 दलित उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात 1 आदिवासी, 1 स्वामी, 1 मुस्लिम, 1 जैन समाजाचा आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीसोबतच जरांगे फॅक्टर संपल्याचा दावा अनेकांकडून केला जातोय. मराठवाड्यात आजही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. आता निकालानंतर यावर काय तोडगा निघणार, त्यावरही सर्वांचं लक्ष राहणार आहे. (Maratha MLA )
News Title – Maratha MLA Winners list in Maharashtra Assembly
महत्त्वाच्या बातम्या-
बच्चू कडूंना पराभवाचा जोरदार धक्का, म्हणाले मी…
मोठी बातमी! औक्षण करताना उडाला भडका, नवनिर्वाचित आमदार जखमी
भाजपने विधानसभेला ‘ती’ चूक टाळली; भाजपच्या यशाचं गुपित समोर
निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कुठं घडली घटना?
निकालाबाबत राऊतांचा अजबच दावा; म्हणाले, “जे घडलं त्याला धनंजय चंद्रचूड..”