मुंबई | मराठा आरक्षणासाठी मराठा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनापर्यंत ते स्वीकारणं शक्य नसल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि रमेश कदम, काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत तर भाजपा आमदार सीमा हिरे, आमदार राहुल अाहेर यांनी मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, मराठ्यांचं आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत अडकलं आहे. त्यात आता महाराष्ट्रातील मराठा आमदारांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू करून सरकारला कोंडीत पकडण्याचं प्रयत्न सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ
-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला
-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती
-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!
-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही