Top News

मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

औरंगाबाद | आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यु झाला. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. औरंगाबादच्या समन्वय समितीने हा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणावरून मराठा समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. औरंगाबादमध्ये आंदोलन करताना मोर्चेकऱ्याने गोदावरी नदीत उडी टाकत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा या दरम्यान मृत्यु झाला.

दरम्यान, मराठा समन्वय समितीने याच पार्श्वभूमीवर आक्रमक होत उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा

-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!

-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या