औरंगाबाद महाराष्ट्र

परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी

बीड | मराठा क्रांती मोर्चाच्या बंद निमित्ताने बीड जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी दोन मराठा मोर्चेकरी गंभीर जखमी झाले आहेत.

परळीत बंदचे आवाहन करत एक दुचाकी फेरी निघाली होती. या दुचाकी फेरीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये आकाश चव्हाण आणि साहेब देशमुख या दोघांना डोक्‍यात आणि छातीत दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दरम्यान, या प्रकारानंतर परळीत तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार

-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल

-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या