परभणी | परभणीत मराठा आंदोलन चिघळलं आहे. मोर्चेकरी आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत मोर्चेकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
सलग तिन दिवसांपासून परभणीत आंदोलनाची धग कायम आहे, मात्र आज या आंदोलनाला हिंसक वळण लागंल, आंदोलक कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत काही पेट्रोलपंपावर दगडफेक करत तोडफोड केली. यामध्ये आठ पोलिस कर्मचारी जबर जखमी झाले आहेत.
दरम्यान, आक्रमक जमावाला थोपवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला असून मोठा फौजफाटा परभणीत तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मेगा भरतीतील मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
-मराठा मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश- मुख्यमंत्री
-मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; 1 आॅगस्टपासून महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन!
-गनिमी कावा काय असतो हे 9 आॅगस्टला सरकारला दाखवू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा