सांगा राजे, आणखी किती दिवस शांत बसायचं?, मराठ्यांचा आक्रोश

मुंबई | ९ ऑगस्टचा मुंबई मराठा क्रांती मोर्चा शांततेतच पार पडेल, असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याविरोधात मराठा समाजातून सूर उमटताना दिसत आहेत.

मुंबई मराठा क्रांती मोर्चा ठोस असला पाहिजे, अशी मराठा समाजाची मागणी आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, अशा प्रकारचे मेसेजही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. 

अशातच, “काहीजण कायदा हातात घेण्याच्या तयारीत आहेत, मात्र मुंबई मराठा क्रांती मोर्चा शांततेतच पार पडेल”, असं वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर “सांगा राजे, अजून किती दिवस शांत बसायचं”,असा सवाल विचारला जातोय.

‘थोडक्यात’च्या बातम्या सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर हव्या असतील तर आत्ताच टेलेग्रामवर Thodkyaat News नावाने सर्च करुन किंवा https://t.me/thodkyaat या लिंकवर क्लिकवर करुन ‘थोडक्यात’च्या चॅनेलमध्ये सहभागी व्हा. तसेच व्हॉट्सअॅप फेसबुकद्वारे ही लिंक तुमच्या मित्रांशी शेअर करा.

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या