फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे, मेलो तरी मागे हटणार नाही- मराठा आंदोलक

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचा छळ करत आहेत. तसंच मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, असा आरोप आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी केला आहे.

आझाद मैदानात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली.

मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला दिशाहीन करण्याचं काम केले आहे.  आतापर्यंत 42 मराठा आंदोलनकर्ते मेले. नाक दाबाल तर सरकारच तोंड उघडेल, असं यावेळी उपोषणकर्त्यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारकडे सादर केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अशोक चव्हाण 2019ला लोकसभा लढणार नाही?

-भाजप आमदाराला गावकऱ्यांनी शिव्या घालत गावातून हाकललं!

-तुमच्या वक्तव्यांमुळे आम्ही मार खातो, डायलॉगबाजी बंद करा, संजय निरुपमांना फटकारलं

-मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही- सुधीर मुनगंटीवार

-वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन!