Sharad Pawar | शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.
आंदोलकांनी Sharad Pawar यांना घेरलं
शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आज सकाळी 11 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार झाला आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार (Sharad Pawar) हे बार्शीत राहणार आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्यालाही उपस्थित राहतील.
आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवार माझा आरक्षणाला पाठींबा आहे, असं म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.
आंदोलकांनी अशोक चव्हाणांनाही जाब विचारला
भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारलाय . आरक्षणासाठी तुम्ही काय केलं?, आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो असा सवाल आंदोलकाने केला आहे.
आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे , आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत तुमच्या सोबत नाही तर तुमच्या विरोधात असं आंदोलकांनी अशोक चव्हाणांना सुनावलं आहे.
काल रात्री मुगट या गावात कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते. यावेळी हा प्रकार घडला . दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघात सातत्यानं मराठा आंदोलकांकडून चव्हाण कुटुंबीयांचा विरोध होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सिद्धार्थ मल्होत्राचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सर्वांसमोर केलं असं काही की…
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ साठी मंत्री अदिती तटकरे मैदानात, पुण्यात जंगी कार्यक्रम
‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा
राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!