बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चाची सांगता; संचारबंदीला झुगारून मोठ्या प्रमाणात आंदोलक मोर्चात सहभागी

सोलापूर | मराठा समाजाचा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रोश करत असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी एकत्र येत असल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज सोलापूर मध्ये मराठा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चासाठी छत्रपती संभाजीराजे भाजपा नेते नारायण राणे व छत्रपती उदयनराजे यांनादेखील आमंत्रित करण्यात आलं होतं. पण यापैकी कोणीही आंदोलनाला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरांमध्ये आज संचारबंदी लागू करण्यात आली होती.

सोलापुरातील संचारबंदीचे आदेश झुगारून मराठा आक्रोश मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आणि हे आंदोलन यशस्वी केलं. या आंदोलनाची सांगता करण्यात आली असून मोर्चाचा आयोजकांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आरक्षणासंदर्भातील निवेदन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाल्याचं दिसून आलं. तब्बल दोन हजार पोलिस सोलापूर शहरात व दोन हजार पोलिस ग्रामीण भागात तैनात करण्यात आले होते.

पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असताना देखील सोलापुरात आज मराठा समाजाचा आंदोलन पार पडलं. तसेच सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात आता विनापरवाना मोर्चे काढले जातील असा इशारा नरेंद्र पाटील यांनी या मोर्च्यावेळी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. 

थोडक्यात बातम्या – 

 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More