कोपर्डीच्या निकालानंतर आता मराठा आरक्षणासाठी हालचाल सुरु

पुणे | कोपर्डीच्या निकालानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरु केल्यात. यासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाची पहिली बैठक पुण्यात पार पडली. 

निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मागासवर्गीय आयोगाकडून राज्य सरकारने सादर केलेल्या अहवालाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगानं यापूर्वी मराठा आरक्षणाची मागणी फेटाळून लावली होती. मात्र आयोगाने आता नव्या निकषांनूसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 18 डिसेंबरला या आयोगाची दुसरी बैठक आयोजित करण्यात आलीय.