मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?

मुंबई | मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, अशी शिफारस मागासवर्गीय आयोगाने केल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारा हा अहवाल उद्या सादर होण्याची शक्यता आहे. 

मराठा समाजाच्या अहवालासंदर्भात आज पुण्यात मागासवर्गीय आयोगाची बैठक पार पडली. राज्य सरकारने 15 नोव्हेंबरची मुदत दिली असल्यामुळे आयोगावर मोठा ताण होता.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरत आहे. आधी 58 मूक मोर्चे, त्यानंतर ठोक मोर्चे काढत आरक्षणाची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवली. 

दरम्यान, गेल्या 12 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरु आहे. यामध्ये एकाची प्रकृती देखील खालावली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-ही ‘समृद्धी’ कुणाची?; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद

-मराठा समाजाची प्रतिक्षा संपली? 2 दिवसात सादर होणार अहवाल???

-मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने

-सरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र

-कोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार!