मुंबई | मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी मला पक्षातून काढून टाकलं, असा पुनरुच्चार माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केलाय. त्या टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
मी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून समाजानं चांगला पाठिंबा दिला होता. त्यावेळी पक्षातून काढून टाकून शरद पवार यांनी एकप्रकारे माझा आवाज बंद केला. त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला असता तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलंय.
दरम्यान, आज जरी शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूने असले तरी उद्या ते या मुद्द्यावर ठाम राहतील की नाही याची खात्री देता येऊ शकत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा भाजपला शह; अयोध्या आणि वाराणसीच्या दौऱ्याचं आयोजन
-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील
-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!