“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”

रायगड|मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असं वक्तव्य समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. खाेपोली येथे जिल्हा युवक मेळाव्यादरम्यान पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.

पण मराठा समाजाला आरक्षण मिळावचं ही आमची सर्वांची आग्रहाची भूमिका असल्याचंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती भाजपाला फायदेशीर असल्याचा उल्लेखही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, अयोध्येतील जागा ही बौद्ध समाजाची असून ती वादग्रस्त आहे. त्याबदल्यात आम्हाला दुसरीकडे जागा मिळावी, असंही ते म्हणाले.