बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात 26 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता त्याची सुनावणी आज सकाळी 10:30 वाजता सुरू झाली असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय दिला आहे.

मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत, अशी राज्य सरकारने केलेली दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगून 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता, त्यातच अनेक राजकीय घडामोडी घडत गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर आरक्षणाला स्थगिती दिली होती.

यासंबंधी न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयातर्फे रद्द करण्यात आल्याचा मोठा निर्णय आज दिला आहे. तसेच 50 टक्क्यांच्यावर दिलं गेलेलं मराठा आरक्षण अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान आज स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागेल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र न्यायालयातून आता वेगळाच निर्णय समोर आल्याचं दिसून येत आहे. या सर्व प्रकरणात मराठा समाज नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’

शिवसेनेला रामराम ठोकत ‘या’ बड्या नेत्याची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी

तरुणीने सॅनिटायजर पिऊन कापली हाताची नस; नाशिकमध्ये एकच खळबळ

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

पुणे हादरलं! चक्क गुंडाने केली पोलीस हवालदाराची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More