मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातूनच आरक्षण देण्याची शिफारस!

मुुंबई | मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातूनच आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगानं केली आहे. आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

राज्यघटनेत SC/ST आणि OBC या प्रवर्गातूनच आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देता येईल. तसं आरक्षण दिले तरच ते टिकेल, असं त्यांनी सांगितलं 

अोबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याने अोबीसींच्या आधीच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी नेते आणि संघटनांचा तीव्र विरोध आहे. याकारणामुळे सरकारसमोर नवीन प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-विरेंद्र सेहवागनं महिला क्रिकेटसंघाला दिला ‘हा’ कानमंत्र

-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीसाठी करतोय असा प्रचार

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज दाखल