मराठा आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढणार- देवेंद्र फडणवीस

अकोला | राज्य मागासवर्गिय आयोगाच्या अहवालाची वैधानिक कार्यवाही पुर्ण करून मराठा आरक्षणासह समाजाचे सर्व प्रश्न नोव्हेंबर अखेर निकाली काढू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला अहवाल गोपनिय आहे. अहवाल फुटल्याची केवळ अफवाच आहे. या अहवालावर वैधानिक कार्यवाही पूर्ण केल्यानंतरतच तो खुला करता येणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, समृद्धी मगामार्गाला उद्दव ठाकरे यांच्यासह देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही नाव देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे हे आम्ही ठरवू, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!

-कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!

-मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल

-आगोदर आपल्या लोकांना संभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी