बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली | महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातसुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. यावरून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस आहे. केंद्र सरकारच्या आणि भाजपच्या धोरणात तफावत आहे का?, असा प्रश्न सुप्रिया सुळेेेंनी अधिवेशनात उपस्थित केला. 2018 साली केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार काढून घेतल्यामुळेच मराठा आरक्षण टिकलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये माध्यमांसोबत संवाद साधत होत्या. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेत आज 127 व्या घटनादुरूस्तीचे विधेयक मंजूर झालं. याविषयी सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ची भेट घेतली होती.

महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केल्यामुळेच केंद्र सरकारने 127 व्या घटनादुरूस्तीचे विधेयक मांडले. याचबरोबर 50 टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती पण केंद्र सरकारने अर्धच काम केलं. भाजपचे खासदार वेगळं बोलतात आणि मोदी सरकार वेगळे निर्णय घेतं असतं. भाजप नेते नारायण राणे आणि रावसाहेब दानवेंचा अभ्यास असताना ते संसदेत बोलले नाहीत. त्यामुळे भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस आहे हेच सिद्ध होतं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

राज कुंद्रासोबतचा ‘हा’ फोटो शेअर करत शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा; म्हणाली…

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार!

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय!

‘…त्या दिवशी पुन्हा कडक लॉकडाऊन करणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

राज्यातील हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी, पाळावे लागणार ‘हे’ नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More