मी जे बोलतो ते करतो…; मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार

Maratha Reservation l मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच वातावरण तापलं आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. मात्र तरी देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. अशातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार? :

आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मनोज जरांगे यांच्या रुपाने मराठा समाजाचं मोठं आव्हान असणार आहे. मात्र त्याचा सामना तुम्ही कसा करणार असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका रोखठोक शब्दांत स्पष्ट केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी जे बोलतो ते करतो. तर मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार आहे. याशिवाय मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे

Maratha Reservation l एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला :

याशिवाय मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. त्यानंतर तात्काळ विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देखील देण्यात आले.

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मात्र ते आरक्षण कोणी घालवलं, ते आरक्षण त्यांना कोर्टात टिकवता आले नाही. याशिवाय आता देखील आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, मात्र ते रद्द करण्यासाठी देखील आटापिटा सुरु आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

News Title : Maratha Reservation On Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या-

एआर रहमानचा साऊंड असलेल्या महिंद्राच्या ”या’ भन्नाट कारची फीचर्स जाणून घ्या!

….अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार!

World Food Day! महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ तुम्हाला माहितेय का?

बाबा सिद्दीकी नाहीतर सलमान खान होता टार्गेटवर?, ‘त्या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ

माजी खासदाराच्या पुतण्याने केली आत्महत्या!