’24 तास काम करून लेकरांचं भागत नाही…’; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं

Maratha Reservation Suicide | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी बांधवांकडूनही उपोषण सुरू आहे. यामुळे राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असं चित्र आता समोर आलं आहे. यामध्ये आता मराठा समाजाचा युवक प्रसाद देठेनं आत्महत्या केली आहे. (Maratha Reservation Suicide)

प्रसाद देठे यांनी मराठा समाजाला आरक्षण भेटेपर्यंत जरांगे पाटील मागे हटू नका, असा सल्ला देखील दिला आहे. एवढंच काय तर प्रसाद यांनी आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहिली होती. तसेच त्याने फेसबुक लाईव्ह देखील केलं आहे. त्यामाध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे ते सांगितलं आहे. एवढंच नाहीतर मराठा आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या (Maratha Reservation Suicide) करत असल्याचं प्रसाद देठे म्हणाले आहेत.

प्रसाद देठे हे मूळचे बार्शीतील रहिवाशी आहेत. मात्र ते पुण्यात रोजगारासाठी आले. ते पुण्याच्या वाघोली परिसरात राहत आहेत. ते एका खाजगी कंपनीत काम करत होते. त्याच्या आत्महत्येवेळी पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका अशी विनंती त्यांनी केली आहे.

चिठ्ठी लिहीत आत्महत्या

जयोस्तु मराठा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. (Maratha Reservation Suicide)

जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. (Maratha Reservation Suicide)

मला माफ करा.

तुमचाच प्रसाद

May be an image of text

प्रसाद लाड यांनी फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हटलं?

News Title – Maratha Reservation Suicide Prasad Dethe

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

सोनाक्षी सिन्हा मुस्लिम अभिनेत्यासोबत करणार लग्न, भाऊ म्हणाला…

तैमुरसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार; सैफने घेतला मोठा निर्णय

पाणीपुरी खाणं पडलं महागात, जळगावातील 80 जणांना विषबाधा

श्रद्धा कपूर होणार मोदी घराण्याची सून; जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?