बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे’; मराठा आरक्षणावरून पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई | तात्पुरती स्थगिती उठवण्यात संदर्भातली सुनावणी अचानक ठरलेली नव्हती. ती पूर्वनियोजित असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी राज्य सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

इतक्या महत्वाच्या विषयासंदर्भातील सुनावणीदरम्यान राज्य सरकार तर्फे नेमण्यात आलेला वकील गैरहजर असणे याहून दुसरे बेजबाबदारपणाचे उदाहरण शोधून सापडणार नसल्याचं पाटलांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं आणि आताही द्यायचं नाही. सुनावणीदरम्यान वकील उपस्थित नसणे हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे. परंतु जनता सुजाण आहे ती असल्या कटकारस्थानांना कधीच बळी पडणार नसल्याचं पाटलांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देऊन‌ आपल्या युवकांचे भविष्य सुरक्षित करणे हे आपल्या राज्यासमोरील मोठे आव्हान आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाही आहे आणि हे सर्व केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे होत असल्याचं म्हणत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला.

 

महत्वाच्या बातम्या-

‘दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केला’; उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही?”

‘राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने…’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना चिमटा

“आता यांच्या मुलांची लग्न देखील आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय”

‘आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा’; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More