महाराष्ट्र मुंबई

आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मुंबई | सरकारने येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मोर्चे-आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने सरकारला दिला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

राज्यभर आंदोलनं करुनही अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, मराठा समाजास आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर मूक तसेच ठोक मोर्चे काढत आंदोलनं केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु

-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

-सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण

-राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!

-सचिने अंदुरेचे तीन मित्र ताब्यात; औरंगाबादमध्ये एटीएसची कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या