बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार अपशकुनी, फडणवीस सरकारनं मिळवलेलं Maratha Reservation घालवलं”

मुंबई | महाविकास आघाडी (MVA Goverment) आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये (Party of Opposition BJP) सध्या चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) गतकाही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीला घेरलं होतं. मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस सरकारच्या (Fadanvis Government) काळात मेटे यांच्यावर मराठा आरक्षणाची विशेष जबाबदारी होती.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्याला देशोधडीला लावण्याचं काम सरकारनं केलं आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण, या सर्व घटकांना आरक्षण देण्यात सरकारला अपयश आलं आहे. फडणवीस सरकारनं मिळवलेलं मराठा आरक्षण ठाकरे सरकारनं घालवलं आहे, अशी जोरदार टीका मेटे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात कोणतीच विकास कामे करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी मेटे यांनी सरकारवर केला आहे. ठाकरे सरकार कोणत्या मुहुर्तावर आले नाही. ठाकरे सरकार हे अपशकुनी आहे. ते आल्यापासून राज्यावर अनेक संकटं आली आहेत, अशी घणाघाती टीका मेटे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केल्याची टीका मेटे यांनी केली आहे. मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जहरी टीका सुद्धा केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“अयोद्धा-काशी जारी है, मथुरा की अब तैयारी है”

“भंगार Nawab Malik स्वतःला डिटेक्टीव्ह करमचंद समजायला लागलाय”

Omicron: ओमिक्रॉनवर लस कधी बनणार?, आली ‘ही’ माहिती समोर

‘काँग्रेस एकला चलो साठी सुद्धा तयार’; ‘या’ काँग्रेस खासदाराचं मोठ वक्तव्य

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More