कोल्हापूर | मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याचा मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल, अशी घोषणा सकल मराठा समाज या संघटनेने केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू होतं.
या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन तोडकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या चेहऱ्याला जो कोणी काळ फासेल त्या व्यक्तीचा कोल्हापुरातील मराठा समाज, मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार करेल, असं सांगितल.
थोडक्यात बातम्या-
दिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले!
“मोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल”
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज
प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण