बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा सेवा संघ भाजपसोबत?, पुरुषोत्तम खेडेकरांच्या नव्या लेखानं खळबळ

मुंबई | राज्यातील पुरोगामी चळवळीचा कणा म्हणून संभाजी ब्रिगेडकडे पाहिलं जातं. पुरूषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडने नेहमीच ब्राह्मण आणि पर्यायाने भाजपला विरोध केला आहे. पण संभाजी ब्रिगेडच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त पुरूषोत्तम खेडेकर यांनी घेतलेल्या भूमिकेनं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

संभाजी ब्रिगेड ही रस्त्यावर उतरून लढणारी संघटना म्हणून राज्यात परिचीत आहे. पुरोगामी विचारधारा घेऊन अनेक युवक या संघटनेत काम करतात. 1990 साली मराठा सेवा संघाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत आरएसएस विचारधारेला विरोध करणारी संघटना अशी संभाजी ब्रिगेडची ओळख आहे. पण पुरूषोत्तम खेडेकर यांनी आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य केल्याने खळबळ माजलीये.

मराठा मार्ग या मासिकात संपादकीय लेख लिहून खेडेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. संभाजी ब्रिगेडची आगामी काळातील राजकीय वाटचाल ठरवताना आपल्याला भाजपसोबत युती करावी लागेल, अशी बातमी मासिकात छापून आल्याने चळवळीत काम करणारे युवक बुचकळ्यात पडले आहेत. कायम भाजपला विरोध करत आपली वाटचाल करणाऱ्या संभाजी ब्रिगेडला आपला पुरोगामी बाणा सोडावा लागणार का?, हा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, राज्यातील वैचारिक आणि पुरोगामी बैठकी मांडणारी संभाजी ब्रिगेड आता भाजपसोबत युती करणार या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या 

बॉसनं पगार न दिल्यामुळे पठ्ठ्यानं उचललं धक्कादायक पाऊल…, पाहा व्हिडीओ

‘लहान मुलं कोरोनामुक्त झाले तरी…’; संशोधनातून चिंतेची बाब समोर

केंद्र सरकारची पशुपालकांसाठी मोठी घोषणा, ‘इतके’ लाख जिंकण्याची संधी

वानवडी बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

“नेहरु असतानाच हिंदू मारले गेले, देवाचे आभार माना की RSSचा जन्म झाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More