बीड | मराठा समाज बांधवानी आरक्षणासाठी परळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर रात्रभर ठिय्या आंदोलन केलं असून अजूनही आंदोलन सुरू ठेवलेलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, नोकरभरती आरक्षणानंतर करावी अशा विविध मागण्यांसाठी या बांधवानी दुपारी 12 वाजता मोर्चा काढला होता. हजारो मोर्चेकरी या मोर्चात सहभागी होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न निकाली लावला नाही तर त्यांना विठ्ठलाची शासकीय पूजा करू देणार नाही, असा इशारा या मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!
-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा
-परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचं वादळ; मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
-मराठा आरक्षण देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध- विनोद तावडे
-कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?- सोनिया गांधी