मुंबई | मराठा आंदोलन जसजसं चिघळत आहे, तसतसं मराठा राजकारण्यांबद्दल मराठा आंदोलकांमध्ये रोष निर्माण होत आहे. आता सोशल मीडियावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होत आहे.
चंद्रकांत पाटलांचा जुना फोटो व्हायरल होत असून त्यावरून त्यांच्यावर मराठा आंदोलकांकडून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. हा फोटो 1 ते 4 ऑगस्ट 2011 मधील असून त्यात स्वतः चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासाठी विधीमंडऴाबाहेर निदर्शनं करत आहेत.
दरम्यान, नुकतेच त्यांनी मराठा आरक्षण सरकारच्या हातात नसल्याचे सांगितलं, त्यामुळे त्यांच्यावर हा आरोप होत आहे.
हा समाजाच्या भावनांशी केलेला खेळच
नव्हे का?Pic:1- 4 ऑगस्ट 2011 ला पोटटिडकिने #मराठा_आरक्षण ची मागणी.
Pic:2- 30 जून 2018 मराठा आरक्षण सरकारच्या हातात नाही.
Pic:3- 24 जुलै 2018#MarathaReservation आपल्या (सरकारच्या) हातात नाही.#मराठा_क्रांती_ठोक_मोर्चा #MarathaKrantiMorcha pic.twitter.com/cZ7wzI6qjr
— Vishnu (@_MeVishnu) July 24, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू
-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी
-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील
-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!
-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!