मुंबई | खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आमरण उपोषण करत मराठा समाजासाठी अनेक मागण्या राज्य सरकारसमोर ठेवल्या होत्या. राज्य सरकारकडून संभाजीराजेंना मागण्या मान्य झाल्याचं लेखी उत्तर देण्यात आलं होतं. मात्र, उपोषणास दीड महिना उलटूनही राज्य सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत. यामुळे मराठा विद्यार्थ्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले.
मराठा विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागातील सचिवांच्या दालनात आंदोलन केले. मराठा विद्यार्थ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. झुकेंगे नही म्हणणाऱ्या आजींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे. परंतु, आमच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. जोपर्यंत आमचे प्रश्न सोडविणार नाही तोवर मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला.
आमच्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं. संभाजीराजेंनी राज्य सरकारकडे 14 मागण्या मांडल्या होत्या. त्या मागण्या मान्य झाल्या नसून आमच्या प्रश्नांवर चालढकल करण्यात येत आहे, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. सरकार खेळवायचं काम करत असून सुस्तावलेलं आहे, असा हल्लाबोल विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, आंदोलक मराठा विद्यार्थ्यांनी मंत्रालयात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या कोणत्याही अतिरिक्त मागण्या नसून विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात, असं आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मंत्रालयातील अधिकारी जातीयवादी असल्याचा आरोप केला आहे. आता राज्य सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, बाळा नांदगावकर म्हणतात…
बहुप्रतिक्षित KGF 3 कधी येणार?; रॉकी भाई म्हणाला…
“मला टाॅम अँड जेरी आवडतं, पण सध्या माकड उड्या बघतोय”
“तोंडाचं गटार उघडून त्यांनी स्वत:ची लायकी दाखवली”
इंधन दरवाढीवरून PM मोदींनी महाराष्ट्राला सुनावलं, म्हणाले…
Comments are closed.