विधीमंडळ प्रांगणात मराठी अभिमान गीतातलं महत्त्वाचं कडवं गाळलं

मुंबई | विधीमंडळाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीतातील महत्त्वाचं आणि शेवटचं कडवं गाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला.

सभागृह सुरु होताच अजित पवारांनी हा मुद्दा मांडला. सरकारनं माफी मागावी, अशी मागणी यावेळी विरोधकांनी लावून धरली. विरोधकांच्या गोंधळामुळे अखेर कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

धक्कादायक बाब म्हणजे विधीमंडळाच्या प्रांगणात गाण्यात आलेलं मराठी अभिमान गीत लिपसिंक होतं. सीडी बंद पडल्यामुळे हा प्रकार उजेडात आला. त्यामुळे आज विधीमंडळात पुन्हा एकदा मराठीची अवहेलना झाल्याचं समोर आलंय. 

कोणतं कडवं गाळलं?

”पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,

आपुल्या घरात हाल सोसते मराठी…

हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी,

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी…”