बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

मुंबई | नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक विरुद्ध राज्य सरकार अशी खडाजंगी सध्या पाहायला मिळत आहे. येथील नागरिक राज्य सरकार विरोधात नामकरणावरून निदर्शनं करत आहेत. तसेच राज्य सरकारला भूमिपुत्रांकडून विरोधही होताना पाहायला मिळत आहेत. याच प्रकरणात आता एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती. भविष्यातील दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर देखील भूमिपुत्रांकडून विरोध अधिक वाढलेला दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला अटक करण्यात आली आहे. मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या या अटकेनंतर स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, शिवसेना कार्यकर्त्याकडून पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता पुढील सुनावणी दरम्यान मयुरेश कोटकरला जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ जिल्ह्यातील नागरिकांचा चिंतेत भर; कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

देशातुन कोरोना हद्दपार; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 75 दिवसांतील सर्वात मोठी घट

महागाईने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले; महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका

नाशिकमध्ये कोरोनानंतर ‘या’ आजारांनी काढलं डोकं वर; प्रशासनाच्या चिंतेत भर

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More