मुंबई | अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असतात. काही दिवसापूर्वी तो वांद्रे स्थानकावर घडलेल्या घटनेवर व्यक्त झाला होता. त्यानंतर आता कोरोनाचा सामना कसा करायचा हे सांगितलं आहे.
प्रवीण तरडेने ‘कोरोनाच्या या गनिमाला घराच्या सीमेवरच हरवायचं आहे, अशा आशयाचं एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्र गेली हजारो वर्षं गनिमांशी लढतच आलाय, असं प्रवीण तरडेने म्हटलंय.
गनिम आता कोरोनाच्या रूपात आलाय त्याला कसा ठेचायचा हे आम्हा शिवबाच्या लेकरांना चांगलच ठाऊक आहे. हा गनिम सीमेवर जावून नाही तर घराच्या सीमेत राहून ठोकायचाय, असं ट्विट प्रवीण तरडेने केलं आहे.
दरम्यान, या ट्विटच्या माध्यमातून त्याने जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर घरातच रहा कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असला सल्ला त्याने दिला आहे.
महाराष्ट्र गेली हजारो वर्षं गनिमांशी लढतच आलाय ..आता गनिम कोरोनाच्या रूपात आलाय त्याला कसा ठेचायचा हे आम्हा शिवबाच्या लेकरांना चांगलच ठाऊक आहे .. हा गनिम सीमेवर जावून नाही तर घराच्या सीमेत राहून ठोकायचाय ..
— Pravin Vitthal Tarde (@WriterPravin) April 16, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
चीनचा भारताला मदतीचा हात; पाठवले साडे 6 लाख रॅपिड किट
महत्वाच्या बातम्या-
आनंद तेलतुंबडेंना अडकवणाऱ्या सामाजिक-राजकीय शक्तींना हरवूया- प्रकाश आंबेडकर
अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळलं; भारतापेक्षा पाकला जास्त मदत
बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जमा केलेला निधी आपण दुर्बल घटकांसाठी वापरूयात- प्रकाश आंबेडकर
Comments are closed.