महाराष्ट्र मुंबई

“कंगणाचं ऑफिस अनधिकृत? असेलही… पण ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे?”

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर राज्यातूनही काहींनी महापालिकेवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता शशांक केतकरने संताप व्यक्त केला असून यासंदर्भात त्याने एक फेसबूक पोस्ट केली आहे.

कंगना राणावतचं ऑफिस अनधिकृत? असेलही.. पण मग ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे? आधी परवानग्या कोणी दिल्या? माझा कुठल्याही एका पक्षावर आरोप नाही किंवा कोणालाच पाठिंबा नाही कारण इथे सगळेच समान भष्ट्राचारी आहेत, अशा शब्दात शशांकने आपला संताप व्यक्त करत सर्वजण भ्रष्टाचारी असल्याचं म्हटलं आहे.

शशांकने ही पोस्ट लिहिण्यामागचा उद्देश सांगितला की, मी 2013 मध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता आता 2020 उजाडलं मात्र तरीही त्या फ्लॅटचा ताबा शशांकला मिळाला नसून तो फ्लॅट अजूनही अपुर्ण अवस्थेत असल्याचं शशांकनं सांगितलं आहे.

दरम्यान, माझी सगळी कागदपत्रे क्लिअर आहेत, तरीही फक्त बोगस बिल्डरमुळे आणि राजकीय वादामुळे आम्ही सगळे फ्लॅटचे मालक हातावर हात धरून गेली सात वर्षे बसून आहोत. आमच्या मागे खरंच कुठलाच राजकीय पाठिंबा नाहीये, मग आमचं काय आणि फक्त हेच नाही तर जगण्यासाठी रोज स्ट्रगल करावा लागतोय त्या फसवणुकीचं काय, असा सवालही त्याने आपल्या पोस्टमधून केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्या पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते’; ‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा!

अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावलेला टेम्पो; पोलिसांनी पकडल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील

कोरोनाच्या आव्हानाला आपण सर्वांनी संधी म्हणून पाहिले पाहिजे- भगतसिंग कोश्यारी

कंगणाची क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी तुलना; ‘या’ अभिनेत्यानं केलं ट्विट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या