बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचा रसिकांना संदेश. . .

मुंबई | सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे सध्या अनेकांना घरातच रहावं लागत आहे. त्यामुळे त्यांचं रूटीन बदललं आहे. याचाच प्रभाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडत आहे. अश्यातच घरात राहून अनेकांमध्ये एकटेपणाची भावना जागृत होत आहे.

जर लॉकडाउन असाच पुढे सुरू राहिला तर लोकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत तर अनेक लोकांनी यासाठी डॉक्टरांकडे मदत मागितली आहे. पण कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सध्यातरी घरी रहाणं हा एकच पर्याय समोर आहे. अश्यातच लोकांच्या मनामध्ये एकटेपणाची भावना जागृत होऊ नये यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे सरसावले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणं अश्या अनेक गोष्टी करताना पाहायला मिळत आहे.

दीपाली सैयद, हार्दिक जोशी, मानसी नाईक, देवदत्त नागे, संदीप पाठक, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे, अक्षया देवधर, पुनीत बालन, स्मिता शेवाळे, भार्गवी चिरमुले, किरण गायकवाड, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, सुयश टिळक, संग्राम साळवी

सेलिब्रिटींनी एकत्र येऊन एक संदेश लोकांसाठी तयार केला आहे, त्यात ते सांगतात की सद्य परिस्थितीचा सामना आपण सगळेच करतोय त्यामुळे स्वतःला एकटं समजू नका, आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घरी राहा, आणि स्वतःची काळजी घ्या.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ

वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!

महत्वाच्या बातम्या-

मी उद्धवजींवर टीका नाही करणार, वाटलं तर सूचना करेन – पंकजा मुंडे

पुणे शहरात नव्या 15 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

लॉकडाऊनमध्ये मुलगा अडकला; आईने तब्बल 1400 किमी स्कूटर चालवून परत आणलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More