अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
मुंबई । मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे अलीकडच्या काळात सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिच्या सौंदर्याने ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. काही दिवसांपासून भाग्यश्री तिच्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो टाकत आहे.
तिचे चाहते देखील तिच्या फोटोजला कमेंट करत असतात. भाग्यश्रीने नुकतेच नवीन फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोची झलक तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकली.
“Now You Know Whats My Kinda Phool” असं कॅप्शन तिने तिच्या या फोटोला दिलं. भाग्यश्रीने स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोला तिचा चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद देत भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. यापूर्वी तिने तिच्या व्हॅकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेर केले होते. त्यावेळेस देखील तिच्या फोटोला चांगली पसंती मिळाली.
भाग्यश्री मोटे रुपेरी पडद्यावर जरी कमी असली तरी मात्र ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असते. “काय रे रास्कला” या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाचे प्रवासला सुरवात केली. शिवाय तिने दाक्षिणात्य चित्रपटात देखील कम केलं आहे. माध्यमांच्या माहितीनुसार भाग्यश्री लवकरच तमिळ चित्रपटात झळकणार आहे. तिने मृत्युंजयमंत्राचा टॅटू काढला होता त्यावेळेस देखील तिला ट्रोल केलं गेलं होतं. माझा टॅटू काढण्याचा हेतू शुद्ध होता मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, असं त्यावेळेस भाग्यश्री म्हणाली होती.
थोडक्यात बातम्या-
शिंदे गटाच्या ‘या’ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!
गौतम अदानी मुकेश अंबानींच्या जिओला देणार टक्कर!
“धनुष्यबाण आमचा प्राण आहे, आधी प्राण जाईल मग धनुष्यबाण”
उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण….- बच्चू कडू
Comments are closed.