अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, पण ‘या’ कारणामुळे मुक्काम तुरुंगातच
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) अटक करण्यात अली होती. वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेल्या केतकी चितळेचा जामीन अखेर मंजूर करण्यात आला आहे.
केतकी चितळेच्या जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात युक्तिवाद पार पडला. मराठी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर काही दिवसातच केतकीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिचा तुरूंगातील मुक्काम वाढतच गेला. ठाणे कोर्टाने अनेकदा केतकी चितळेला कोठडी सुनावली होती. खूप दिवसंपासून केतकीच्या जामिनीसाठी प्रयत्न सुरु होते. नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली.
केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे (Adv. Yogesh Deshpande) आणि विरोधी सरकारी वकील अमित कटारणावरे (Adv.Amit Katarnaware) यांच्यात युक्तिवाद देखील झाले. या प्रकरणी युक्तिवाद सुरु असताना केतकी चितळे यांच्या वकिलाने केतकीला या प्रकरणावर जामीन मंजूर व्हावा यासाठी युक्तिवाद केला. अखेर आज ठाणे कोर्टाने केतकीचा जमीन मंजूर केला आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाणे कोर्टाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिचा जामीन मंजूर केला आहे. केतकीच्या प्रकरणातील पुढील सुनावणी 21 जून रोजी होणार असल्याने पुढते पाच दिवस केतकीला तुरूंगातच राहावं लागणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘एखाद्याच्या अंगात येतं तसं संजय राऊतांच्या अंगात आलं आणि…’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ची कोट्यवधींची कमाई, आकडा ऐकून थक्क व्हाल
कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी!
सर्वसामान्यांना झटका; आता नवीन गॅस कनेक्शनसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रूपये
‘अजून किती फोटो काढणार?’; मलायका अरोरा चाहत्यांवर भडकली
Comments are closed.