‘चूक झाली माफ करा, पदरात घ्या’; प्राजक्ताची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मुंबई | मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने कायम चर्चेत असते. तिच्या वेब सिरीज, सिनेमा आणि टी.व्ही शो यापेक्षा अभिनेत्री सोशल मीडियावरच्या पोस्टने चर्चेत असते. सोशल मीडियावर तीची फॅन फॉलोईंग सुद्धा वाढत चाललीये.
प्राजक्ताने स्वतःचा नवीन दागिन्यांचा ब्रँड सुरु केला आहे आणि त्यामुळे ती रोजच चेर्चेत येतीये. तिने सुरु केलेल्या दागिन्याचं नाव ‘प्राजक्ताराज’ (Prajaktaraj) असं आहे. या ब्रॅंडचं अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हास्ते पार पडलं होतं.
त्यांनतर प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यामागचं कारण म्हणजे, तिन् तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन काळ्या कपड्यांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने मकर संक्रातीच्या शुभेच्छा देत Sorry for delay. प्राजक्तराज मुळे श्वास घ्यायला फुरसत मिळेना आणि या गोष्टीचा अतीव आनंद आहे. त्यामुळे घ्या पदरात, असं म्हणाली आहे.
तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला भन्नाट कमेंटस केल्या. तर काही चाहत्यांनी ‘तू कधीही फोटो टाकले तरी आम्ही पाहणारच’ अशा कमेंट केल्यात.
तिच्या कामाचं बोलायचं झालं तर ती एका नवीन चित्रपटासाठी शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शुटिंग करतच ती तिचं नवीन ब्रॅंड संभाळत आहे.
थोडक्यात बातम्या-
थंडीचा जोर वाढल्यानं ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
गौतमी पाटील एका शोसाठी घेते ‘इतकं’ मानधन!
“रामदेव बाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”
विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बसचा भीषण अपघात
Comments are closed.