बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ मराठी अभिनेत्री का म्हणतेय?, हा ट्रॅप आहे यात अडकू नका

मुंबई | मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले (Maratahi Actress Shubhangi Gokhle) यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हा ट्रॅप आहे, यात अडकू नका. असं त्यांनी आवाहन केलं आहे. खरंतर शुभांगी गोखले यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या फेसबुकवरील मित्र आणि फॅन्सना या ट्रॅपमध्ये अडकू नका, असं आवाहन केलं आहे.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे, ‘पुन्हा एकदा माझं अकाऊंट हॅक झालं आहे. माझ्या नकळत सगळ्यांना मेसेजमध्ये एक लिंक जातेय. कृपया ती लिंक ओपन करू नका,’ असं आवाहन शुभांगी गोखले यांनी केलं आहे. शुभांगी गोखले यांनी यासंदर्भात मी सायबर सेलकडे तक्रार केली असल्याचं देखील त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.

पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे, सायबर सेलने सगळ्यासाठी एक मेसेज पाठवला आहे. तो असा आहे, कृपया कोणी तुम्हाला ही लिकं पाठवली असेल तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे, असं सांगून पुढे हा एक ट्रॅप असल्याचंही पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शुभांगी गोखले या मराठीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्या नुकत्याच ‘येऊ कशी तशी मी नांदायला?’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आल्या होत्या. मात्र, सध्या त्या या मालिकेतून बाहेर पडल्या आहेत. त्यांची मुलगी सखी गोखले ही देखील उत्तम अभिनेत्री आहे. ती मराठी मालिका ‘फ्रेशर्स’मधून प्रेक्षकांसमोर आली होती.

थोडक्यात बातम्या-

AIRTEL धारकांसाठी खुशखबर! ‘या’ प्लॅन्सवर मिळणार 500MB मोफत डेटा

अखेर बहूचर्चित आणि वादग्रस्त कृषी कायदे लोकसभेत रद्द

‘राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे’

1 तारखेला शाळा सुरु होणार?, ओमिक्राॅन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी ‘ही’ दिली माहिती

ठाकरे सरकारचे तीन नवे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर; लवकरच करणार खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More