मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे केलेल्या लॉकडाउनचा आज 9 वा दिवस असून पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आणि पुन्हा एक नवीन उपक्रम राबवला आहे. काही जणांकडून याचं समर्थन केलं जात आहे. अशातच मराठी अभिनेता अभिनेता शशांक केतकर यानं मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे.
मंडळी नका सतत नावं ठेवू! नका सतत दोष काढू! दिवाळीत पणती लावतो, तसंच फक्त 9 मिनिटं पणती, दिवा, मोबाइलचा फ्लॅश लावायचा आहे तुमच्या घरातच राहून … कॅंडल मार्च काढू नका!, असं शशांकनं म्हटलं आहे.
येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व लाइट्स बंद करून दरवाजात किंवा बाल्कनीत येऊन दिवा, मेणबत्ती किंवा मोबाइल फ्लॅशलाइट 9 मिनिटांसाठी लावावी असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.
दरम्यान, मोदी यांच्या आवाहनावर देशातील नागरिकांकडून संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांकडून याचं समर्थन केलं जात आहे तर अनेकांनी मोदींच्या आवाहानावर टीका करत त्यांना ट्रोल केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“तबलिगी जमातीच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये.. ही सरकारची जबाबदारी”
मोदीसाहेब, आपण पंतप्रधान आहात की इव्हेंट मॅनेजर??- रूपाली चाकणकर
महत्वाच्या बातम्या-
केंद्राने धान्य देताना कोणतीच अट ठेवली नाही मात्र राज्य सरकारने अटी ठेवल्या आहेत- फडणवीस
“बाकी देशाचे पंतप्रधान उपचार शोधत आहेत आणि आमचे टाळ्या वाजवायला अन् मेणबत्या पेटवायला सांगतायेत”
उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव; मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह
Comments are closed.