बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राठोडांवर कारवाई करण्याची धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो”

मुंबई | मराठी भाषा दिनावरून मनसे आणि सरकारमध्ये मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. मनसेने उद्याच्या म्हणजेच 27 फेब्रुवारीच्या मराठी भाषेच्या दिनानिमित्त मुंबईत आजोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अमेय खोपकर आक्रमक झाले आहेत.

कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे. त्या नियमांचं काटेकोर पालन करुन मनसेने ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला, असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

ज्याच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडसारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात. अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात ‘मराठी भाषा दिवस’ का खुपतो?, असं म्हणत खोपकरांनी सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा धागा पकडत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच मराठी आहे की काय?, आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच, असं खोपकरांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘पूजाच्या आत्महत्येदिवशी संजय राठोड यांचे 45 फोन कॉल’; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा दावा

पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला 7 पोती शेंदूर, समोर आली तेजस्वी मूर्ती!

रॉबर्ट वाड्रा करणार राजकारणात एन्ट्री; केली ही मोठी घोषणा!

‘अजब सरकारची गजब कहाणी’; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

“संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More