Top News मनोरंजन

मेरे सैय्या सुपरस्टार; लग्नमंडपात नवरीनं केलेल्या डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

पुणे | मेरे सैय्या सुपरस्टार, ओ मेरे सैय्या सुपरस्टार… नव्या नवरीनं मंडपात पाऊल ठेवताच हे गाणं वाजायला लागलं आणि तीनं चक्क या गाण्यावर ठेका धरला. नुसता ठेकाच धरला नाही तर एकदम बिनधास्त डान्स केला. तिच्यासोबत वऱ्हाडी मंडळींनीही एकच कल्ला केला. फोटोग्राफर, फोनवाले कॅमेरे घेऊन सरसावले. व्हिडीओ सोशल मीडियावर पडला आणि तुफान व्हायरल झाला.

सोशल मीडिया वापरणाऱ्यांपैकी कुणी हा व्हिडीओ पाहिला नसेल असं सहसा शोधून सापडणार नाही. प्रत्येकाच्या टाईमलाईनला एकदा का होईना हा व्हिडीओ येऊन गेलाच असेल. मंडपात प्रवेश करताना नवरीनं केलेला हा डान्स आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

लग्न कुठं होतं? कुणाचं होतं? हा व्हिडीओ कुणी काढला? याबद्दल कुणाला काही ठोस माहिती नाही किंवा सोशल मीडियावरील लोकांना ती जाणून घ्यायचीही नाही, मात्र त्यांनी या व्हिडीओला चांगलंच उचलून धरलंय.

लग्न मंडपात प्रवेश करताना नवरी मुलगी सहसा एकदम शांतपणे, लाजत वगैरे प्रवेश करते, मात्र या नवरीचा स्वॅग काही निराळाच आहे. तिचा हा स्वॅग पाहून नवरा मुलगाही च्याट पडल्याचं दिसतंय. वऱ्हाडी मंडळींनी देखील तोंडात बोटं घातली नसतील तरच नवल…

सोशल मीडियावर जसा काही लोकांना हा व्हिडीओ आवडलाय, तसाच काही लोकांना हा व्हिडीओ अजिबात आवडलेला नाही. त्यांनी या प्रकारावर टीका सुद्धा केलीय, मात्र सोशल मीडियावर या नवरीची जोरदार चर्चा रंगलीय एवढं मात्र नक्की…

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”

“आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त; आम्ही कृती आणि अॅक्शनवाले”

“कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही”

कोरोनाच्या लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण!

पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या