अरारारारा खतरनाक…. ‘मुळशी पॅटर्न’ आता येणार हिंदीत; असणार ‘हा’ मोठा कलाकार

मुंबई |  अभिनेता सलमान खान आयुष शर्माला घेऊन ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक करतोय. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचा हा हिंदी रिमेक असून यामध्ये आयुष ऍक्शन रोल मध्ये दिसणार आहे.
बऱ्याच दिवस सलमानला या सिनेमाचे हक्क मिळण्यासाठी वाट पाहावी लागली होती. त्याला आता सिनेमाचे हक्क मिळाले आहेत.
दरम्यान, प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न हा सिनेमा मुळशी गावातील सत्य घटनेवर आधारित असून यात शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे. यात ओम भूतकर मुख्य भूमिकेत दिसला होता.

महत्वाच्या बातम्या 

-“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारला फास लावेल”

-भाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं?

-मी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार

-…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

-श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल