Top News महाराष्ट्र मुंबई

‘तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता…’; या मराठी दिग्दर्शकाने सचिनला सुनावलं

Sachin Tendulkar Facebook

मुंबई | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेमुळे सचिनचे चाहते त्याच्यावर नाराज असल्याचं दिसत आहे. अशातच मराठी दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी सचिनला सुनावलं आहे.

सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतय, असं समीर विध्वंस यांनी म्हटलं आहे.

सचिनने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आणि ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या दोन हॅशटॅगचा वापर केला. यानंतर त्याच्या सचिनने शेतकरीविरोधी उद्गार काढले अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.

दरम्यान, सचिनचा भारतरत्न पुरस्कार काढून घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांप्रमाणे आक्रमक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?”

“आंदोलक शेतकरी देशद्रोही मग अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?”

“भाजपच्या नेत्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही उगाच कशाला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”

‘सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल’; संभाजी ब्रिगेड आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या