बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सक्रिय रुग्णांसह नवी रुग्ण संख्या आटोक्यात

मुंबई | महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गेल्या 3 महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

महाराष्ट्रात आज फक्त 06 हजार 269 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 07 हजार 332 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 224 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा जरी कमी होत असेल तरी धोका अद्याप टळलेला नाही, असं प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 62 लाख 58 हजार 079 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 60 लाख 29 हजार 817 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 93 हजार 479 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील गेल्या काही महिन्यात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली होती. पण आता नव्या डेल्टा प्लसने डोकं वर काढलं असताना राज्यभरात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होणार की, वाढत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

थोडक्यात बातम्या –

“बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आम्ही सर्वजण तुमच्यसोबत”

जीव लावून लढला पण फक्त एका चुकीमुळं महाराष्ट्राच्या प्रवीणचं मेडल हुकलं!

“महाराष्ट्राला शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापूजा करावी, 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती दूर होईल”

रायगड, रत्नागिरीसह नुकसानग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारची आर्थिक मदत; निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ वर्ग

मला पॉर्न कंटेंटच्या कामासाठी…; पॉर्नोग्राफी प्रकरणी सई ताम्हणकरचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More