‘सैराट’च्या हिंदी रिमेकचा मार्ग मोकळा, लवकरच चित्रिकरणाला सुरूवात

मुंबई | मराठी प्रेक्षकांना याड लावणाऱ्या ‘सैराट’ चित्रपट लवकरच हिंदीतही येणार आहे.  हिंदी सैराटच्या चित्रिकरणाला 1 डिंसेंबरपासून सुरूवात होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून सैराटच्या हिंदी रिमेकला मूहूर्त मिळत नव्हता. पण आता लवकरच चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.

सैराटचं मराठीतील यश पाहून बॉलीवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं सैराटचे हक्क विकत घेतले होते. त्यानंतर सैराटचा हिंदीतून रिमेक करायची घोषणाही केली होती.

सैराटच्या हिंदी रिमेकला अनेक अडचणींमुळे चित्रिकरणासाठी मूहूर्त मिळाला नव्हता. मात्र आता सगळ्या अडचणींतून मार्ग काढत लवकरच चित्रिकरणाला सुरूवात होईल.