मुंबई | महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नोकरीचा हक्क मागण्यासाठी मराठा तरुण मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरीच्या नियुक्तीचा मार्ग निकाली न काढल्यास मातोश्रीसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
गेल्या 6 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा तरुण आंदोलन करत आहेत. या आक्रमक आंदोलनकर्त्यांनी आत्महदनाचा इशारा दिला आहे. सरकारनं कोणत्याच मागण्यांची दखल न घेतल्याने मराठा तरुण आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता आत्महनाचा इशारा दिला आहे.
शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही मराठा समाजातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांना 5 वर्षांपासून नियुक्त्या मिळाल्या नाहीत. या उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, मराठा तरुणांना नियुक्तीची मागणी करत हे आंदोलनकर्ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“प्रत्येक सरकार मराठा समाजातील मुलामुलींसाठी जागा भरण्याच्या घोषणा करतायेत”
लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर
महत्वाच्या बातम्या-
देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा- सोनम कपूर
तहसीलदारबाई हिरोईनसारख्या दिसतात म्हणणाऱ्या लोणीकरांची सारवासारव, म्हणतात…
विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या!
Comments are closed.