राज्यातील विद्यार्थ्यांचा गणवेश ठरला! असा असणार शालेय गणवेश; वाचा संपूर्ण नियमावली

School Uniform l पालकांनो तुमच्या पाल्याच्या शिक्षणासंदर्भात एक मोठी बातमी आहे. पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

शालेय गणवेशासंदर्भात नवीन नियमावली जारी :

सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

यंदाच्या वर्षी राज्यातील शाळा 15 जून, 2024 पासून नियमित सुरू होणार आहेत. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी ठरवून दिलेला गणवेश धारण करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा.

School Uniform l पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना असा असणार गणवेश :

इयत्ता. 1 ली ते इयत्ता. 4 थी मुली –

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक असणार
स्काऊट व गाईड गणवेश – मंगळवार, गुरूवार आणि शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक असणार

इयत्ता 5 वी मुली –

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असणार
स्काऊट व गाईड गणवेश – मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक असणार

इयत्ता. 6 वी ते इयत्ता. 8 वी मुली आणि इयत्ता. 1 ली ते इयत्ता. 8 वी मुली (ऊर्दू माध्यम) –

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार याशिवाय गडद निळ्या रंगाची ओढणी असणार
स्काऊट व गाईड गणवेश – मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी असणार

इयत्ता.1 ली ते इयत्ता. 7 वी मुले –

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट असणार
स्काऊट व गाईड – मंगळवार, गुरूवार व शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट असणार

इयत्ता. 8 वी मुले –

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळया रंगाची फुल पॅन्ट असणार
स्काऊट व गाईड – मंगळवार, गुरूवार व शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट असणार

News Title : Marathi School Uniform

महत्त्वाच्या बातम्या- 

धो-धो पाऊस कोसळणार; राज्यातील या जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट जारी

या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होणार

मोठी बातमी! मुरलीधर मोहोळांना मिळालं ‘हे’ महत्त्वाचं खातं

नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ जाहीर, कुणाला कुठलं खातं?, वाचा एका क्लिकवर

“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही”, मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार