मनोरंजन

शिवरायांचा सिंह गर्जला; ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा मराठी ट्रेलर!

मुंबई |’आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’ असं म्हणत स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या, एकनिष्ठ तानाजींच्या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचा मराठी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘जसा मातीच्या प्रत्येक कणात एक पर्वत असतोया, प्रत्येक बीमध्ये एक जंगल, प्रत्येक तलवारीत एक सेना….तसाच प्रत्येक मराठ्यात दडला आहे लाख मराठा…’, अशा दमदार डायलॉगसह चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला आहे.

अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान आहे.

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत ते मोहीम फत्ते करण्यासाठी निघाले. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर मावळ्यांनी किल्ला जिंकलासुद्धा; पण शत्रूशी बेभान होऊन लढताना हा सिंह धारातीर्थी पडला. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या