Top News

सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!

पुणे | मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात मोर्चा काढण्यात आला. डेक्कनवरील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चेकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवून मोर्चाचा समारोप होणार आहे.

एक मराठा, लाख मराठा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत. मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशा अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या–

-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती

-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”

-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही

-शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!

-परभणीत मराठा आंदोलन चिघळलं; पोलिसांचा हवेत गोळीबार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या